घरचं जेवण खाऊनही वजन वाढतंय किंवा थकवा येतोय?; तुमचं ताट खरंच ‘हेल्दी’ आहे का?
Healthy Home Food Nutrition Guide: घरचं जेवण नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असतं अशी आपली धारणा असते, पण ते पूर्णपणे संतुलित आहे का? प्रसिद्ध स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट सायली नाईक यांच्या मते, केवळ घरचे खाणे म्हणजे आरोग्यदायी आहार नव्हे. आपल्या रोजच्या ताटात योग्य प्रमाणात प्रथिने (Proteins), कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर नसतील तर आरोग्याचा समतोल बिघडू शकतो.