कर्करोग उपचारांत वरदान ठरू शकणारी ‘प्रोटॉन थेरपी’ काय आहे?
पारंपरिक रेडिएशनमुळे त्यांच्या शरीरातील इतर नाजूक अवयवांवर किंवा निरोगी पेशींवर परिणाम झाला, तर त्यांना आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात किंवा भविष्यात पुन्हा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. प्रोटॉन थेरपीमुळे इतर निरोगी पेशींचे संरक्षण होत असल्याने बरा झालेल्या मुलाला भविष्यात शक्यतो इतर कोणताही आजार उद्भवत नाही.