३ दिवसांपूर्वीच सर्व रिपोर्ट क्लिअर, तरीही हार्ट अटॅक? कारण काय?
नागपूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे ३१ डिसेंबरच्या पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर हृदयविकाराच्या धोक्याशी संबंधित कोणते घटक आपण दुर्लक्षित करत आहोत, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल, ईसीजी तपासणी, तसेच आहार आणि तंदुरुस्ती यांसारख्या नेहमीच्या निकषांची पूर्तता असतानाही हृदयविकाराचा धोका नेमका कुठून उद्भवतो, याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.