मिरची खरंच भारतीय नाही? मग हजारो किलोमीटर दूरवरून ती आपल्या स्वयंपाकघरात कशी आली?
मिरचीचा तिखटपणा वर्णन करणारी अनेक गाणी, गोष्टी आपण ऐकतो; पण मिरची म्हणजे फक्त तिखटपणा नव्हे तर चव, रंग, ऊर्जा आणि विविधतेचा संगम आहे. ती अन्नाला केवळ झणझणीत करत नाही, तर त्याला आकर्षक रूप देते, भूक वाढवते आणि चवीला उठाव देते. त्यामुळे मिरची ही केवळ तिखटपणाचे प्रतीक नसून, चैतन्य, उर्जा आणि उत्साहाची देखील चव आहे.