नालंदा विद्यापीठात थेट रामायण-महाभारतातून का शिकवले जातायत परराष्ट्र धोरणाचे धडे?
आजचे जग एका गुंतागुंतीच्या वळणावर उभे आहे. एका बाजूला अमेरिका, चीन आणि रशिया यांसारख्या महासत्तांमधील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे; दुसऱ्या बाजूला ऊर्जा संकट, हवामान बदल, युद्धे, आर्थिक अस्थिरता आणि नैतिक नेतृत्वाचा अभाव अशा समस्या जगासमोर उभ्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे या आधुनिक संकटांना उत्तर देण्यासाठी केवळ पाश्चात्य राजकीय सिद्धांत पुरेसे आहेत का? की भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेतही आजच्या जागतिक व्यवस्थेला दिशा देण्याची क्षमता आहे?