‘हूडी’ घालून गडावर आलेला आरोपी अन् १७ कोटींच्या लग्नाचा रक्तरंजित शेवट!
पिंपरी-चिंचवडमधील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा, नोव्हेंबर महिन्यात उदयपूरच्या आलिशान राजवाड्यात १७ कोटींचा शाही विवाहसोहळा आणि पाहुण्यांसाठी थेट खाजगी विमानांची सोय… असं सगळं स्वप्नवत सुरू असतानाच १८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून धक्कादायक बातमी आली. २५ वर्षीय केतन अग्रवाल यांचा ट्रेकिंगदरम्यान सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले.