‘वंदे मातरम्’च्या घोषणेने शिवसेनेला कशी मिळाली पहिल्यांदाच मुंबईची सत्ता?
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘वंदे मातरम्’ला थेट प्रचाराच्या केंद्रस्थानी आणले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एका राष्ट्रीय गीताचा राजकीय मुद्दा म्हणून वापर होणे, ही त्या काळात उल्लेखनीय बाब होती. या रणनीतिचा शिवसेनेला चांगलाच राजकीय लाभ झाला. विजयी झालेल्या जागांच्या संख्येत पक्ष पहिल्या क्रमांकावर नव्हता, तरी ‘वंदे मातरम्’भोवती उभ्या राहिलेल्या भावनिक वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत केली.