घरी एकटे असताना कार्डियाक अरेस्ट आला तर काय कराल? स्वतःचा जीव कसा वाचवाल?
भारतातील एकूण मृत्यूंपैकी जवळपास १०% मृत्यू हे अचानक आलेल्या कार्डियाक अरेस्टमुळे होतात. सुमारे ९०% कार्डियाक अरेस्टच्या घटना या रुग्णालयाबाहेर (घरी, प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी) घडतात. अनेकदा रुग्ण घरी एकटाच असतो. त्यामुळे कार्डियाक अरेस्टमुळे होणारा मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काय खबरदारी घ्यावी आणि डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.