ओसामा बिन लादेनचा अंत कसा झाला? १५ वर्षांनंतरही अमेरिकेच्या ‘त्या’ मोहिमेची चर्चा कशासाठी?
९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अमेरिकेने तब्बल १० वर्षे ओसामा बिन लादेनचा शोध घेतला आणि अखेरीस २ मे २०११ रोजी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे एका विशेष मोहिमेत त्याला ठार मारले. हीच मोहीम ऑपरेशन नेपच्यून स्पिअर म्हणून ओळखली जाते. या वर्षी या मोहिमेला आता १५ वर्षे पूर्ण झाली. मी आजवरची जगातील सर्वाधिक थरारक मोहीम मानली जाते.