मृत्यूनंतरही मानवी शरीर स्वतःहून हालचाल करते? वैज्ञानिक प्रयोगात नेमके कोणते रहस्य उलगडले?
मृत्यू हे मानवी जीवनातील सर्वात मोठे रहस्य आहे. हृदय थांबले की सर्व काही संपले, असा आपला समज असतो. पण, विज्ञानाने अलीकडेच एक असा खुलासा केला आहे जो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येवू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, मृत्यूनंतरही मानवी शरीर स्वतःहून आपली जागा किंवा स्थिती बदलू शकते. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या एका सखोल अभ्यासामुळे फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) आणि गुन्हे तपासाच्या पद्धतींमध्ये मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.