मेंदूच्या ‘या’ आदिम भागात आहे जाणीवेचे उगमस्थान; न्यूरोसायन्समधील शोध काय सांगतो?
विज्ञान आणि तत्त्वज्ञानात जाणीवेची व्याख्या करणे सर्वात कठीण मानले जाते. जाणीव म्हणजे केवळ झोपेतून 'जागे असणे' नव्हे, तर जागृत अवस्थेत 'अनुभव घेता येणे' होय. आपण एखादे गाणे ऐकतो, तेव्हा कान फक्त आवाज ऐकत नाहीत, तर मन त्या संगीताचा आनंद घेते. आपल्याला सुई टोचते, तेव्हा केवळ शरीराला जखम होत नाही, तर 'मला वेदना होत आहेत' अशी अंतर्गत जाणीव होते.