दाऊद इब्राहिमला खुले आव्हान देणारा हुसेन उस्तारा कोण होता?
शाहिद कपूरचा आगामी गुन्हेगारीपट ओ रोमिओचा टीझर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचा हा चित्रपट कुख्यात गँगस्टर हुसेन उस्ताराच्या आयुष्यावर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांना २ कोटींची मागणी करणारे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्याचे समोर आले आहे. हे पत्र हुसेन उस्ताराची मुलगी सनोबर शेख हिने पाठविल्याचे सांगितले जाते.