संस्कृती, व्यापार की संघर्ष? काय आहे भारत-पर्शिया संबंधांचा हजारो वर्षांचा इतिहास?
भारत आणि पर्शिया (आजचा इराण) यांच्यातील संबंधांची पाळेमुळे प्रागैतिहासिक काळातील मानवी स्थलांतरापर्यंत पोहोचतात; म्हणजेच लिखित इतिहास सुरू होण्याच्या खूप आधीपासून हे दोन्ही प्रदेश एकमेकांशी जोडलेले होते. जनुकीय (Genetic) आणि पुरातत्त्वीय पुराव्यांवरून असे दिसून येते की, सुमारे १०,००० वर्षांपूर्वी प्राचीन इराणी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले लोकसमुदाय पूर्वेकडे भारतीय उपखंडात आले आणि त्यांनी येथील आधीपासून राहणाऱ्या शिकारी व अन्न गोळा करणाऱ्या (Forager) स्थानिक समुदायांबरोबर संवाद व देवाणघेवाण सुरू केली.