INS विक्रांतला वाचवणारा भारताचा तो ‘माइंड गेम’ काय होता?
डिसेंबर १९७१… भारत आणि पाकिस्तानमधील संबंध युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. संपूर्ण देशाचे लक्ष सीमावर्ती भागांकडे लागलेले असताना, समुद्रात मात्र एक अत्यंत गुप्त आणि तितकाच थरारक बुद्धीबळाचा डाव खेळला जात होता. या डावाच्या केंद्रस्थानी होती भारतीय नौदलाची तत्कालीन सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका अर्थात ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant)!