इराण युद्धामुळं आता ‘आयटी’ उद्योगही संकटात! ॲमेझॉन कंपनीवरील हल्ल्यामुळे चिंतेचे वातावरण
अमेरिका-इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील संघर्ष वाढला आहे. इराणने बहरीनमधील ॲमेझॉन कंपनीच्या इमारतीवर ड्रोन हल्ला केला, ज्यामुळे आखाती प्रदेशातील आयटी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना आता आखाती देशांतील गुंतवणुकीबाबत पुनर्विचार करावा लागत आहे.