‘Thank You India’ की केवळ ‘काश्मीर’?; इराणच्या दुटप्पी भूमिकेचा काश्मीरशी काय संबंध?
आंतरराष्ट्रीय राजकारणात शब्द आणि संदर्भांना कमालीचे महत्त्व असते. कधीकधी एका साध्या ‘धन्यवाद’च्या पोस्टमुळेही दोन देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो किंवा तिसऱ्या देशाच्या पोटात गोळा येऊ शकतो. सध्या भारत आणि इराणच्या संबंधांच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांवर भारतीय जनतेचे आभार असा संदेश लिहिल्याचे समोर आले आहे.