श्रीगणेशाच्या चरणी, जास्वंदाचं फूल! पण हेच फूल भाविक आणि अभ्यासकांना प्रिय का?
भक्तीत दंग झालेलं मन प्रत्येक गोष्टीत आपल्या प्रिय देवाचं रुप पाहात असतं. देवाइकीच ती गोष्टसुद्धा भाविकांना प्रिय होऊन जाते. म्हणूनच 'जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला, गणपती दिसला' गणेशोत्सवात हे गाणं कानांवर पडतं, तेव्हा डोळ्यांसमोर येते ती गणरायाची सर्वांग सुंदर आकर्षक मूर्ती आणि श्रीगणेशाला वाहिलेली लालचुटूक जास्वंदीची फुलं. गणरायाच्या पूजेसाठी आवर्जून वापरलं जाणारं हे फूल केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही, तर त्यामागे लोकपरंपरा, धार्मिक श्रद्धा, वनस्पतीशास्त्र आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं दडलं आहे.