३० हजार फूट उंचीवर वैमानिकाला हार्ट अटॅक; २२० प्रवाशांचा जीव कसा वाचला?
अलीकडेच वाढलेल्या विमान अपघातांमुळे अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतातही अनेकजण देशांतर्गत प्रवासासाठी विमानाची तिकीटं उपलब्ध असतानाही ट्रेन किंवा इतर माध्यमांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाविषयीची भीती आणखी वाढताना दिसत आहे. त्यातच आणखी एका बातमीने लोकांची झोप उडवली आहे, ती म्हणजे टेनेरिफहून बर्मिंगहॅमकडे जाणाऱ्या Jet2 या विमानाच्या पायलटला उड्डाण घेतल्यावर विमान ३० हजार फूट उंचीवर असताना हार्ट अटॅक आला. परंतु, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे?