बौद्ध साहित्यातील ‘हत्थिवतिक’ परंपरेचा गणेशाशी काय संबंध?
गणपती या देवतेची लोकप्रियता केवळ भारतीय उपखंडापुरती मर्यादित राहिलेली नाही. मुख्य प्रवाहातील हिंदू देवतापरंपरांपासून तंत्र परंपरेपर्यंत गणेशाला महत्त्वाचे स्थान मिळाले. इतकेच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धार्मिक परंपरांमध्येही वेगवेगळ्या काळात गणेशाची रूपे सामावून घेतली गेली. त्यामुळे आज आपल्याला परिचित असलेला गजानन हा एका प्रदीर्घ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा परिणाम असल्याचे दिसते.