केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; चेतनच्या मित्राच्या अटकेने हत्येचं गूढ उलगडणार?
लोहगड किल्ल्यावरुन ढकलून व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. या प्रकरणात ७९ दिवसांनी तिसरी मोठी अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता चेतनचा मित्र रितेश हांगे याला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा भयंकर कट, डिलीट केलेले डिजिटल चॅट्स आणि आरोपींचे परस्परविरोधी दावे यांमुळे या हत्या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. रितेशच्या भूमिकेबाबत पोलीस तपास करत आहेत.