उन्हाळ्याआधीच Kidney stone आणि UTI च्या रुग्ण संख्येत वाढ; लक्षणे काय आहेत?
कडक उन्हाळ्यात नेहमीच किडनी स्टोन अर्थात मूतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या (UTI) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. परंतु, यावर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. निर्जलीकरण, बैठी जीवनशैली आणि मधुमेह तसेच लठ्ठपणाचे वाढते प्रमाण याचा या दोन्ही आजारांशी जवळून संबंध आहे. हिवाळ्यात साधारणपणे दररोज किडनी स्टोनचा एक रुग्ण आढळतो; मात्र उन्हाळ्यात ही संख्या दुप्पट होते आणि महिन्याला ५० ते ६० रुग्णांपर्यंत पोहोचते, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.