गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया टळणार? गोळ्या-औषधांविना करता येणार मात!
"मी रोज सात ते आठ तास भरपूर झोपतो, तरीही सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर ठेवताना गुडघे जाम आखडलेले असतात. दिवसभर अंगात आणि सांध्यांमध्ये एक प्रकारचा जडपणा राहतो." हा अनुभव सध्या घराघरांत ऐकायला मिळतो. कोणत्याही मोठ्या आजाराची किंवा सांधेदुखीची सुरुवात अशीच अगदी सौम्य आणि घरगुती तक्रारींपासून होते. सुरुवातीला जिना चढताना-उतरताना थोडा त्रास होतो. नंतर सकाळी उठल्यावर गुडघे आखडल्यासारखे होतात. नंतर चालताना, बसताना किंवा थोडे अंतर चालल्यानंतरही सांध्यात ठणका मारू लागतात.