१३९ वर्षांनंतर सापडलं F.J. King जहाज! फक्त २ तासांत लेक मिशिगनचं रहस्य उलगडलं तरी कसं?
इतिहास हा कधीकधी एखाद्या जुन्या कपाटात धूळ खात पडलेल्या पुस्तकासारखा असतो, तर कधी तो महासागरांच्या आणि अथांग सरोवरांच्या काळोख्या तळाशी दडलेला असतो. अमेरिकेतील लेक मिशिगन (Lake Michigan) हे अशाच अनेक रहस्यांचे माहेरघर मानले जाते. याच सरोवराच्या पोटात गेली १३९ वर्षे एक रहस्य दडलेले होते, या रहस्याला स्थानिक लोक ‘घोस्ट शिप’ किंवा भुताटकीचं जहाज म्हणायचे. १८८६ साली म्हणजे तब्बल १३९ वर्षांपूर्वी नाहीसे झालेले ‘F.J. King’ हे जहाज अखेर सापडले आहे.