लोहगड किल्ल्याच्या गणेश दरवाजाखाली खरंच दिला होता का मानवी बळी? इतिहास की, केवळ अफवा!
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर अलीकडे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका पर्यटकाच्या मृत्यूनंतर हा परिसर चर्चेचा विषय ठरला. सुरुवातीला हा मृत्यू दरीत पडून झालेला अपघात असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र नंतर पोलीस तपासात इतर शक्यतांचाही विचार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. या घटनेचा किल्ल्याशी जोडल्या जाणाऱ्या अलौकिक किंवा भुतांच्या कथांशी कोणताही संबंध नसला, तरी या नव्या चर्चेमुळे लोहगडाशी संबंधित लोककथांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.