काशीच्या महाश्मशानातील तो गूढ आकडा; मृत्यूनंतरही कर्मांचा हिशोब कसा होतो?
राखेवर ‘94’ लिहिल्यानंतर, अंत्यविधी पाहणारे पुजारी किंवा गुरु एक अंतिम विधी करतात. चितेवर पाण्याने भरलेल मातीच मडकं फोडलं जातं. या विधीला कपाल क्रिया म्हणतात. हा संस्कार सर्व भौतिक बंधनांचा पूर्णतः त्याग दर्शवतो. काशीतील मणिकर्णिका घाट केवळ अंत्यसंस्कारांचे स्थळ नाही, तर तो एका गहन पौराणिक स्मृतीचा साक्षीदार मानला जातो. या घाटाचा संबंध आदिशक्तीच्या सती अवताराशी जोडला जातो.