इराणचा ताजमहालशी काय संबंध? इराणी दुतावासाने ताजमहालावरून रुबिओ यांना ट्रोल का केले?
इराण आणि अमेरिका यांच्यातील डिजिटल युद्ध आता भारतापर्यंत पोहोचले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली असता, इराणच्या दूतावासाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. ताजमहालचा इराणी इतिहास, मुमताज महलचे पर्शियन कनेक्शन आणि वास्तुकलेतील इराणी योगदान यांचा संदर्भ देत इराणने रुबिओ यांना "इतिहासाची समज नाही" असे म्हणत ट्रोल केले आहे.