ऑनलाइन फसवणुकीचा स्फोट! भारतावरच आंतरराष्ट्रीय स्कॅम नेटवर्क्सचा डोळा का?
मेटाच्या 'एडवर्सरियल थ्रेट रिपोर्ट'नुसार, सोशल मीडियावरील फसवणूक, एआयचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यांचा प्रभाव वाढत आहे. भारतातील इंग्रजी भाषिक वापरकर्ते विशेषतः लक्ष्य आहेत. स्वस्त इंटरनेट, डिजिटल पेमेंट्सचा प्रसार आणि कमी डिजिटल साक्षरता यामुळे फसवणूक वाढली आहे. 'डिजिटल अरेस्ट'सारखे स्कॅम, एआय-आधारित फसवणूक आणि 'न्युडिफाय' अॅप्सबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मेटाने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून, डिजिटल साक्षरतेवर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.