हिंदुत्वाची भाषा बदलतेय, पण विचारसरणी नाही; मोहन भागवतांचं वक्तव्य नेमकं काय सांगतं?
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील भाषणातील सर्वसमावेशक वक्तव्यांवरून हिंदुत्वाची विचारसरणी बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, ही केवळ भाषा बदलण्याची रणनीती असून मूळ विचारसरणीत कोणताही मूलभूत बदल झालेला नाही. भागवतांचे विधान, विविधतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुस्लिम समुदायाबाबतची भूमिका आणि संघाचा गेल्या १०० वर्षांतील राजकीय प्रवास आणि हिंदुत्वाची बदलती रणनीति यावर सुहास पळशीकर यांचे विश्लेषण