काँक्रीटीकरणामुळे महाराष्ट्रातील शहरांमध्ये अचानक पूर का येतोय?
प्राचीन भारतीयांनी त्यांच्या नेणिवेमध्ये नदीच्या पाण्याकडे केवळ एखादं रासायनिक संयुग किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहीलं नाही, तर प्राचीन भारतीयांसाठी ती वैश्विक मातेच्या स्वरुपात एक जागृत, श्वास घेणारी स्वतंत्र यंत्रणा होती! मात्र यंत्रयुग' (Machine Age) सुरू झाले आणि आपल्या पारंपरिक धारणांवर पाश्चात्त्य (Western) विचारसरणीचा प्रभाव पडला. हा प्रभाव एखाद्या संथ गतीने पसरणाऱ्या शेवाळ्यासारखा होता आणि आहे.