मुंबईचा पहिला भाजप महापौर ४० वर्षांपूर्वीच झाला होता; कोण होते डॉ. प्रभाकर संजीव पै?
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर भाजप मोठी राजकीय ताकद म्हणून पुढे आल्याने, मुंबईला आता पक्षाचा ‘पहिला’ महापौर मिळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चेत एका महत्त्वाच्या ऐतिहासिक संदर्भाकडे दुर्लक्ष झाले आहे. मुंबईने ४० वर्षांपूर्वी भाजपचा पहिला महापौर आधीच पाहिला आहे. फक्त त्यावेळी वेगळी राजकीय परिस्थिति होती, एवढेच. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत, डॉ. प्रभाकर संजीव पै यांच्या रूपाने मुंबईला भाजपचा पहिला महापौर लाभला होता.