Nanjing Massacre: ८५ वर्षांपूर्वीची घटना आजही चीन-जपान तणावाचे केंद्र का आहे?
गेल्या काही आठवड्यांपासून चीन आणि जपानचे राजनैतिक प्रतिनिधी आणि सरकारी प्रवक्ते एकमेकांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी, “चीनने तैवानवर हल्ला केल्यास जपान लष्करी पद्धतीने प्रतिसाद देईल,” असे म्हटल्यापासून हा तणाव अधिकच वाढला आहे. जपान आणि चीन यांच्यातील तणावाचे मूळ कारण तैवान नाही. हा संघर्ष गेले काही वर्षे सतत सुरू आहे. यामागे ऐतिहासिक आणि सामरिक स्पर्धा तसेच गुंतागुंतीचा इतिहासही आहे.