मेंदू ते अवयवांपर्यंतचं नैसर्गिक ‘केबल कनेक्शन’! संशोधकांना कसा गवसला या जाळ्याचा नकाशा?
शरीरभर पसरलेल्या मज्जासंस्थेच्या जाळ्याचा नकाशा समजून घेण्यासाठी उंदरांवर पथदर्शी संशोधन झालं आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना' इथे झालेलं हे संशोधन ‘Cell’ या जगन्मान्य विज्ञानपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झालं आहे. मेंदूतलं विशिष्ट न्यूरॉन्सचं जाळं आणि शरीरातल्या विविध अवयवांमध्ये संवाद कसा होतो, संदेशवहन नेमकं कसं होतं, हे समजून घेणं या नकाशामुळे आता शक्य होणार आहे.