नवीन नॅशनल पेन्शन सिस्टिम नियम २०२५; सामान्य नागरिकांनी काय जाणून घेणे आवश्यक?
नॅशनल पेन्शन सिस्टिम (नॅशनल पेन्शन सिस्टिम) ही केंद्र सरकारची निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी महत्त्वाची योजना आहे. सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचारी या योजनेत नियमितपणे गुंतवणूक करतात. १६ डिसेंबर २०२५ रोजी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टिम मधून बाहेर पडणे व पैसे काढण्याबाबतचे नियम मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. हे बदल सामान्य नागरिकांसाठी अधिक लवचिक व उपयुक्त ठरणारे आहेत.