AI in Operation Sindoor युद्धभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कसा केला AI चा वापर ?
भारताने ६ आणि ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत भारतीय संरक्षण दलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून पाकिस्तानचे हल्ले अचूक ओळखले आणि परतवले. AI-आधारित क्लाऊड सिस्टीमने हवाई हल्ल्यांची ओळख पटवून त्यांची स्थाननिश्चिती केली. संरक्षण मंत्रालयाने २०१८ साली AI धोरणात्मक परिणामांचा अभ्यास केला आणि विविध AI प्रकल्प राबवले. DRDO ने हवाई हल्लाविरोधी प्रणाली विकसित केली.