पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांच्या मुंबईतील बंगल्याचे संवर्धन; का? कशासाठी?
जिना हाऊस ही मालमत्ता 'इव्हॅक्यूई प्रॉपर्टी' म्हणून ओळखली जाते. म्हणजे अशा व्यक्तीची मालमत्ता, जी १९४७ मध्ये भारत सोडून पाकिस्तानमध्ये स्थायिक झाली. १९४९ साली जिना हाऊस हे तत्कालीन मुंबई सरकारने ताब्यात घेतले होते. ही भव्य वास्तू १९३६ साली पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक मोहम्मद अली जिना यांनी स्वतःसाठी मलबार हिल येथे बांधली होती. आता ही वास्तू लवकरच दुरुस्ती व पुनर्बांधणी प्रक्रियेतून जाणार आहे.