‘क्रिशन नगर’ परत आलं! फाळणीनंतर पुसलेलं लाहोरचं हिंदू-शीखांचं अस्तित्व पुन्हा जिवंत
सध्या पाकिस्तानातील नामांतराच्या बातम्या चर्चेत आहे. पाकिस्तानच्या लाहोर शहरात फाळणीनंतर जवळपास आठ दशकांनी रस्त्यांची, गल्ली-बोळाची, ब्रिटिशकालीन वास्तूंची पूर्वीची नावं पुन्हा देण्यात येत आहेत. यातील अनेक स्थळांचे फाळणीनंतर इस्लामी, पाकिस्तानी किंवा स्थानिक व्यक्तींच्या नावावर नामकरण करण्यात आले होते. सध्याच्या नव्या नामांतराच्या लाटेत ‘इस्लामपुरा’ पुन्हा एकदा ‘क्रिशन नगर’ झाले आहे.