५० वर्षांनंतर पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशात; भारताविरोधात नेमकं शिजतंय तरी काय?
१९७१ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका बांगलादेशात दाखल झाल्या आहेत. ही घडामोड भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नवीन अशरफ हे बांगलादेशाच्या दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांची भेट घेतली आणि त्यांच्या समकक्ष अॅडमिरल एम नजमुल हसन यांच्याशी चर्चा केली.