१९९१ साली सोनं गहाण ठेवून भारताने कसं बदललं स्वतःच नशीब?
१९९१ साली देशाची प्रतिष्ठा आणि अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी देशाला सोने विदेशी बँकांमध्ये गहाण ठेवावे लागले होते. १९९१ चे ते आर्थिक संकट म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात कठीण, तरीही देशाला नव्या दिशेकडे नेणारा एक टर्निंग पॉईंट ठरला. १९९१ साली ज्या देशाकडे अवघ्या ३ आठवड्यांचे चलन होते, त्याच भारताचा परकीय चलन साठा आज २०२४-२५ मध्ये ७०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. आज भारत सोने गहाण ठेवणारा देश नाही, तर जगातील सर्वात मोठा सोने खरेदीदार देश ठरला आहे.