डाळिंब खाल्ल्याने ऑस्टिओआर्थरायटिस बरा होतो का? काय सांगते नवीन संशोधन?
वयानुसार गुडघे दुखणे, जिना चढ-उतार करताना तीव्र वेदना होणे, सकाळी उठल्यावर सांधे कमालीचे आखडणे किंवा चालताना गुडघ्यांतून कटकट असा आवाज येणे… या तक्रारी आजच्या काळात नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे 'वय झाले की हे व्हायचचं असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या नेहमीच्या वाटणाऱ्या वेदनांमागे अनेकदा ऑस्टिओआर्थरायटिस हा सांध्यांचा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि दीर्घकालीन विकार असण्याची शक्यता असते.