चीन आणि पाकिस्तानचं भारताविरुद्ध ‘प्रॉक्सी युद्ध’ सुरू; नेमकं हे युद्ध असतं तरी काय?
पाकिस्तान भारतापेक्षा डावपेचात हुशार आहे आणि त्यातही त्याला समविघाती लोकांची साथ मिळाली तर काय होवू शकते याची कल्पना करणं देखील भयावह आहे. याचीच प्रचिती मे महिन्यात झालेल्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील DGMO पातळीवर झालेल्या चर्चेदरम्यान भारताकडून झालेल्या हल्ल्यांच्या मार्गांची अचूक माहिती पाकिस्तानने दिली. ही माहिती चिनी उपग्रह, सिग्नल इंटेलिजन्स (SIGINT) विमाने आणि रडार स्वीप्सद्वारे मिळवण्यात आली होती. त्यामुळे चीनचे ‘छुपं युद्ध’ तंत्र उघड झाले.