वैयक्तिक हानी झाली तरी ‘राजधर्म’ का महत्त्वाचा? ऋग्वेदातील पुरुरवा-उर्वशी कथेचे मर्म काय?
भारतीय इतिहासात पुरुरवा आणि उर्वशी ही अत्यंत रोचक कथा आहे. हे संवादात्मक सूक्त (ऋग्वेद १०. ९५) वैदिक साहित्यातील जुन्या प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. परंतु ही केवळ प्रेमकथा नाही तर मानवी आणि दैवी संबंध यावरील कथा आहे. ऋग्वेदातील पुरुरवा -उर्वशी ही कथा आदिबंधात्मक, कठोर सत्य सांगणारी आहे. निसर्ग (अप्सरा) आणि मानव (राजा) यांचे मिलन क्षणभंगुर असते, तसेच दैवी आणि मानुषी प्रेम याची परिणीती चिरवियोगातच होते हे सांगते. ऋग्वेदातील ही कथा वास्तववादी आणि तत्त्वज्ञानावर आधारित आहे.