पायथागोरसच्या आधी भारतीय ऋषी बौधायनांनी मांडलं होतं हे प्रमेय!
काटकोन त्रिकोणाच्या सर्वांत लांब बाजूवरील वर्गाचं क्षेत्रफळ हे उर्वरित दोन बाजूंवरील वर्गांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकं असतं, हेच जगप्रसिद्ध ‘पायथागोरसचं प्रमेय’ आहे. साधारणपणे आपल्याला असं शिकवलं जातं की, पायथागोरस नावाच्या ग्रीक तत्त्वज्ञाने इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास या प्रमेयाचा शोध लावला. मात्र, या प्रमेयाचा खरा इतिहास इतका सरळसोट आहे का?