२०५० पर्यंत ३५ लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा विळखा?; लॅन्सेटचा संशोधन अहवाल काय सांगतो?
‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या मालिकांमधून झळकलेली मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे ग्रेड-१ ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वी झुंज देते आहे. अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. राजश्री देशपांडे हिने स्वतः इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. राजश्री हे एकच उदाहरण नाही, तर भारतात ब्रेस्ट कॅन्सरची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर Lancet Oncology मध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन नेमकं काय सांगते याचाच घेतलेला हा आढावा.