संजय-मनेका गांधी: सत्तेच्या सावलीत उमललेलं प्रेम आणि अपघाती अंत… अधुरी एक कहाणी!
काही प्रेमकथा काळाच्या प्रवाहात विरून जातात, तर काही इतिहासाच्या पटलावर जखमेसारख्या कायम राहतात. भारतीय राजकारणाच्या धगधगत्या केंद्रस्थानी अशीच एक प्रेमकथा जन्माला आली. गुलाबी स्वप्नांनी सुरू झालेली ही कहाणी फार लवकरच नियतीच्या कठोर वास्तवाला सामोरी गेली. संजय गांधी आणि मनेका गांधी यांची ही कथा केवळ प्रेमाची नाही; ती आहे सत्ता, एकटेपणा, अपघात आणि आयुष्यभर न भरून निघालेल्या विरहाची! ही कहाणी आजही ऐकणाऱ्यांना अस्वस्थ करून जाते!