संजय राऊतांना पोटाचा कॅन्सर; भारतात गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका का वाढतोय?
भारतामध्ये पोटाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी पहिल्या दहामध्ये (Top 10) आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पोटाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असून, पुरुषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता महिलांपेक्षा सुमारे तीन पट जास्त आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना पोटाचा कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले.