मेंदू जागा अन् शरीर झोपलेले; अंगावर ‘चावा’ येतो म्हणजे नक्की काय? न्यूरोसायन्स काय सांगते?
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही एका भयावह अनुभवाची चर्चा रंगते. रात्रीच्या गाढ झोपेत अचानक जाग येते, पण शरीर दगडासारखं जड झालेलं असतं. हात-पाय हलवता येत नाहीत, ओरडण्याचा प्रयत्न केला तरी आवाज फुटत नाही आणि कोणातरी अमानवीय शक्तीने छातीवर बसून गळा दाबल्याचा भास होतो. यालाच गावगाड्यात ‘चावा’ येणे, ‘हडळ बसणे’ किंवा ‘दडपण येणे’ असं म्हटलं जातं. मात्र, हा खरोखरच एखाद्या अदृश्य शक्तीचा कोप आहे, की झोप आणि मेंदूच्या कार्यप्रणालीशी संबंधित एक वैज्ञानिक घटना? याचाच शोध घेणारा हा आढावा.