शाळकरी मुलांवर लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्याची वेळ; हा धोका कसा टाळाल? तज्ज्ञ काय सांगतात?
शाळकरी मुलांमध्ये फॅटी लिव्हर हा आजार दुर्मीळ वाटू शकतो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सध्या हा आजार दीर्घकालीन यकृत विकारांसाठी महत्त्वाचे कारण ठरत आहे. लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या सुमारे १० ते १७ टक्के शाळकरी मुलांमध्ये हा आजार मूळ धरत असल्याचा अंदाज आहे.