रात्री जागताय? विशी-तिशीतील तरुणांमध्ये ‘या’ कारणामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका!
बदलती जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रीन पाहण्याची सवय आणि कामाच्या शिफ्ट्समुळे आजकाल बहुतांश लोकांची झोप अपुरी होत आहे. मात्र, ही अपुरी झोप केवळ थकवा किंवा मानसिक तणावापुरती मर्यादित नसून, ती थेट जीवघेण्या आजारांना आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ASCO) च्या अभ्यासानुसार, शरीरातील 'निद्रानाश' (Insomnia) आणि अपुऱ्या झोपेमुळे कॅन्सरचा धोका (Sleeplessness and cancer risk) कमालीचा वाढतो आहे.