पोटाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो? संशोधन काय सांगते?
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या पोटाच्या कर्करोगामागे ‘स्लो पॉयझनिंग’ (हळूहळू दिलेले विष) असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिवाय, या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांना ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पोटाचा कर्करोग आणि विषबाधा हे विषय सध्या चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पोटाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो याबाबत आजवरचे संशोधन काय सांगते? याचा घेतलेला हा आढावा.