मुत्तकींच्या भेटीतून उघड होतोय का अफगाणिस्तानातील भारताचा नवा प्लॅन?
अफगाणिस्तानचे तालिबानी परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांचा भारत दौरा सध्या सुरू आहे. ते १६ ऑक्टोबरपर्यंत भारतात असणार आहेत. या पहिल्या अधिकृत भेटीत त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तसेच आग्रा आणि देवबंद येथील इस्लामी शिक्षणसंस्थांना ते भेट देतील. ही भेट भारताच्या परराष्ट्र धोरणातील कलाटणीचा क्षण मानली जाते. कारण नवी दिल्लीने अद्याप तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नसली तरी बदलत्या भूराजकीय स्थितीमुळे आणि संरक्षणाच्या नव्या गणितामुळे हा संवाद अपरिहार्य ठरला आहे.